पुणे : स्तनपान करू न शकणार्‍या माता आणि मुदतपूर्व जन्माला आलेली बालके किंवा ज्यांना आई नाही अशी बालके यांना आईचे दूध मिळणे आता सहज शक्य होणार आहे.

वाकड येथील सूर्या हॉस्पिटलने नुकतीच मानवी दुग्धपेढी (ह्यूमन मिल्कबँक) सुरू केली आहे. मानवी दुग्धपेढीचे उद्घाटन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. रुग्णालयाचे नवजात शिशू विकार तज्ज्ञ डॉ. सचिन शहा, स्तनपान सल्लागार डॉ. मनीषा खलाणे यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा