बुफालो पार्कः भारतीय महिला क्रिकेट संघाला पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेत होणार्‍या टी-20 विश्वचषकात खेळायचे आहे. याआधी महिला संघ तिरंगी मालिका खेळत आहे, ज्यामध्ये त्यांचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. या सामन्यात स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 27 धावांनी शानदार विजय नोंदवला. या सामन्यात आपला पदार्पणाचा सामना खेळणार्‍या अमनजोत कौरने एक मोठ्या विक्रमाला गवसनी घातली.

फलंदाज अमनजोत कौरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केले. तिने 30 चेंडूत 41 धावांची मॅचविनिंग खेळी खेळली. या कारणास्तव तिला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. या सामन्यात दीप्ती शर्माने अष्टपैलू कामगिरी केली. या सामन्यात भारतीय महिला संघाने 6 बाद 147 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकचा संघ 9 बाद 120 धावांच करु शकला.

या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. अमनजोत कौर क्रिजवर येईपर्यंत भारतीय संघ रुळावर आला नव्हता आणि निम्मा संघ तंबूत परतला होता. त्यावेळी धावफलकावर फक्त 69 धावा होत्या. त्यानंतर दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौरने संघाचा डाव सावरला. अमनजोत कौर पहिल्याच सामन्यात दमदार फलंदाजी करताना 30 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या.
7 व्या क्रमांकावर 9 वर्षे जुना विक्रम मोडला –

सातव्या क्रमांकावर येताना, कौरने तिच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय डावात 3- चेंडूंचा सामना केला आणि नाबाद 41 धावा केल्या. तिच्या खेळीत 7 चौकारांचा समावेश होता. सातव्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर असलेल्या कोणत्याही महिला फलंदाजाने केलेल्या सर्वोच्च धावसंख्येचा हा नवा भारतीय विक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम झुलन गोस्वामीच्या नावावर होता, जो तिने 2014 मध्ये केला होता. तिने 38 धावा केल्या होत्या.

फलंदाजीनंतर आफ्रिकन संघाची धुलाई करणार्‍या दीप्ती शर्माने गोलंदाजीची धुरा सांभाळली. तिन इथेही धमाका केला. ऑफस्पिनर दीप्ती शर्माने 4 षटकात 30 धावा देत 3 महत्त्वाचे बळी घेतले. तिच्याव्यतिरिक्त लेगस्पिनर देविका वैदने 3 षटकांत 19 धावा देत 2 महत्त्वाचे बळी घेतले. आता भारतीय महिला संघाला 23 जानेवारीला वेस्ट इंडिजविरुद्धचा पुढील सामना खेळायचा आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा