अमरावती : अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू बुधवारी अपघातात जखमी झाले. अमरावतीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, दुपारनंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना नागपुरात हलविण्यात आले असल्याचे वृत्त आहे.
काल सकाळी सातच्या सुमारास रस्ता ओलांडताना हा अपघात झाला. बच्चू कडू यांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला चार ते पाच टाके पडले. शिवाय, पायालाही मार लागला. बच्चू कडू यांनी स्वतः ट्विट करुन अपघाताबाबतचे वृत्त दिले होते. माझी प्रकृती चांगली आहे. कार्यकर्त्यांनी काळजी करु नये, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.