स्मरण तेजाचे : संकलन : शैलेंद्र रिसबूड

11-जानेवारी-1892 (सोमवार)

आजच्या दिवशी, नवे गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांचा हस्ते नवीन Fergusson College चा पहिला पायाचा दगड (कोनशिला) बसवला गेला. कॉलेजची इमारत व इतर व्यवस्था पुरी होण्याला तीन वर्ष लागली. दिनांक 2-जानेवारी-1885 (शुक्रवार) दिवशी ‘फर्ग्युसन कॉलेज’चे गद्रे वाड्यात प्रथम कॉलेजचे वर्ग सुरू झाले. विख्यात कवी वर्डस्वर्थ यांचे नातू असलेले प्राचार्य विल्यम वर्डस्वर्थ यांच्या हस्ते ‘फर्ग्युसन कॉलेज’चे उद्घाटन झाले. 05-Mar-1885 (गुरुवार) ला bm Sir James Fergusson साहेबांच्या हस्ते Fergusson College च्या नव्या इमारतीचा कोनशिला समारंभ पार पडला, परंतु या इमारतीचे काम कोनशिला स्थापनेवरच थांबले. फर्ग्युसन नाव का? महाराष्ट्रातील संस्थानिक, जहागीरदार, लहानमोठे इनामदार यांच्या देणग्या आढ्यावेढ्यावाचून मिळवायच्या असतील, तर कॉलेजला गव्हर्नरचे नाव पाहिजे, अशी अट या अपेक्षित देणगीदारांवर नियंत्रण ठेवणार्‍या सरकारी खात्यांमधून बोलली गेली आणि द्रव्य सुलभतेकडे लक्ष देऊन सोसायटीने ती मान्य केली. शिवाय गव्हर्नरची शाळेला भेट, सहानभूती व साडे बाराशे रुपयांची वैयक्तिक देणगी, यांचेही कॉलेजच्या नावाचा विचार करताना भान ठेवणे कॉलेज काढणार्‍यांना आवश्यक होते. फर्ग्युसन कॉलेजमध्ये विषयांची वर्गवारी अशी होती, प्राचार्य आपटे (संस्कृत), टिळक (गणित आणि संस्कृत), केळकर (इंग्रजी), गोळे (भौतिकशास्त्र) आणि आगरकर (इतिहास आणि तर्कशास्त्र). लोकमान्य टिळक कायम मोजून-मापून बोलायचे आणि ते त्यांचा विषय अतिशय अचूकपणे हाताळत. कोणतेही गणित ते अतिशय पटकन सोडवून टाकत, काहीवेळा ते अधलेमधले टप्पे नमूदही न करता तोंडीच गणित सोडवून दाखवत, त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी गोंधळून जायचे; पण अनेक गणितं सोडवण्याची टिळकांची अभिनव पद्धत अनुसरण बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी आनंददायी असायचं. या संदर्भात जी.के.गाडगीळ यांनी असे लिहिले होते – ’प्राध्यापक टिळकांची लेक्चर्स समजून घेणे अवघड जाते, अशी तक्रार फर्ग्युसन कॉलेजातील माझे मित्र करतात. टिळकांची स्मरणशक्ती प्रचंड आहे आणि त्यांची बुद्धिमत्तेची झेपही मोठी आहे. बीजगणितातल्या द्विपदी सिद्धांतांची उदाहरणेदेखील त्यांनी तोंडी स्पष्ट करून सांगितली आणि काही विद्यार्थ्यांना त्यातील टप्पे फळ्यावर लिहून दाखवायला सांगितले. टिळकांचे विद्यार्थी राहिलेले महान इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई म्हणतात – ’बीजगणितात Permutation and Combination हा भाग शिकवताना टिळक पाश्चात्त्य व्यवहारातील उदाहरणे न देता आपल्याकडच्या मुलं-मुलींच्या खेळातील व सामाजिक व्यवहारातील सर्वांच्या परिचयाची निरनिराळी अनेक उदाहरणे देऊन तो विषय इतका मजेदार समजावीत की, त्यांच्या निरीक्षणशक्तीचे सर्वांस मोठे आश्चर्य वाटे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा