कोलंबो : आर्थिक संकटाचा सामना करणार्या श्रीलंकेला भारताकडून 75 बस दिल्या गेल्या आहेत. तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी त्या दिल्या जात आहेत, अशी माहिती भारत सरकारकडून देण्यात आली. शेजारधर्म प्रथम या धोरणाअंतर्गत भारताने श्रीलंकेला वेळोवेळी यापूर्वीॅही मदत केली होती. गंगाजळी आटल्याने श्रीलंकेत परकीय चलनाचा तुटवडा झाला होता. त्यामुळे आर्थिक संकटात हा देश सापडला होता. तेव्हा भारताने मानवतेच्या दृष्टीने अन्नधान्यासह इंधनाचा पुरवठा केला होता. भारताच्या श्रीलंकेतील उच्च आयुक्तांनी भारताने पाठवलेल्या 75 बस प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक चालना मिळणार आहे.
Copyright © 2021 Kesari || Developed by Gigante Technologies Pvt Ltd. || Digital Marketed By MIDM - Master In Digital Marketing