जयपूर : विख्यात अभिनेत्री आणि दिग्दर्शिका अपर्णा सेन यांना शुक्रवारी जयपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जयपूर येथे 15 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शुक्रवारी उद्घाटन झाले. त्या वेळी त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज, कथालेखक कमलेश पांड्ये, निर्माते हैदर हाले यांच्यासह दोनशे निर्माते, दिग्दर्शक, चित्रपट कथालेखक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कारानंतरही माझा या क्षेत्रातील प्रवास सुरूच राहणार आहे, असे सेन या यावेळी सांगितले. महोत्सवात 63 देशांचे 282 चित्रपट शनिवारी दाखवले जाणार आहेत. अशी माहिती दिग्दर्शक हानू रोज म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा