दहा दृश्ये आणि काही संवाद बदलण्याचे आदेश

नवी दिल्ली : शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर ’पठाण’ हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे. वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने या चित्रपटातील सुमारे 10 दृश्ये बदलण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय काही संवादही बदलण्यात आले आहेत. ’बेशरम रंग’ या गाण्याच्या बोलांवर तर काहींनी दीपिका पदुकोणच्या बिकिनीच्या रंगावरून आक्षेप घेतला. या वादांमुळेच सेन्सॉर बोर्डाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

या चित्रपटातील ’रॉ’ हा शब्द बदलून ’हमारे’ आणि ’लंगडे लुले’ऐवजी ’टूटे फुटे’, ’पीएम’ या शब्दाऐवजी ’राष्ट्रपती किंवा मंत्री’ हे शब्द वापरले जाणार आहेत. याशिवाय ’पीएमओ’ हा शब्द 13 स्थानावरून काढून टाकण्यात आला आहे. इतकेच नाही तर ’अशोक चक्र’ला ’वीर पुरस्कार’, ’पूर्व केजीबी’ऐवजी ’पूर्व एसबीयू’ आणि ’मिसेस भारतमाता’ बदलून ’हमारी भारतमाता’ करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा