नवी दिल्ली : देशात 24 तासांत 188 नवे रुग्ण आढळून आले. तर, 201 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या 2 हजार 554 पर्यंत घसरली.

एकूण कोरोना रुग्णसंख्या 4 कोटी 46 लाख 79 हजार 319 वर पोहोचली. त्यापैकी, 4 कोटी 41 लाख 46 हजार 55 जणांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.80 टक्के असून, मृत्युदर 1.19 टक्के आहे. रुग्णसंख्या वाढीचा दैनंदिन दर 0.10 टक्के आणि साप्ताहिक दर 0.12 टक्के आहे. देशात आतापर्यंत 5 लाख 30 हजार 710 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. काल तीन बळींची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत 61 हजार 828 जणांनी, तर आतापर्यंत 2 अब्ज 20 कोटी 12 लाख 33 हजार 762 जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसमात्रा घेतली. देशात कोरोना रुग्णसंख्येने 19 डिसेंबर 2020 रोजी एक कोटीचा टप्पा ओलांडला होता. तर 4 मे 2021 रोजी 2 कोटी, 23 जून रोजी 3 कोटी, तर 25 जानेवारी 2022 रोजी 4 कोटींचा टप्पा ओलांडला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा