सेउल : उत्तर कोरियाने शनिवारी शक्‍तीप्रदर्शन केले. त्याअंतर्गत लघु पल्ल्याची तीन क्षेपणास्त्रे पूर्व समुद्राच्या दिशेने डागली. दक्षिण कोरियाने सीमेवर प्रथमच ड्रोन पाठवल्याच्या पार्श्‍वभूमीवर शक्‍तीप्रदर्शन केल्याचे सांगितले जात आहे.

दक्षिण आणि उत्तर कोरियात या आठवड्यात ड्रोनवरून तणाव वाढला आहे. उत्तर कोरियाचे ड्रोन सीमावर्ती भागात उडत आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दक्षिण कोरियानेही आपले ड्रोन प्रथमच सीमा परिसरात धाडले. यानंतर उत्तर कोरियाने शनिवारी तीन क्षेपणास्त्रे डागून त्याला सडेतोड उत्तर देत शक्‍तीप्रदर्शन केले आहे. या क्षेपणास्त्रांनी सुमारे 350 किलोमीटरचा प्रवास केला. त्यानंतर ती समुद्रातील पाण्यात कोसळली होती. त्या माध्यमातून दक्षिण कोरियाला लक्ष्य करता येते की नाही, याची चाचणी घेतली आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात दक्षिण कोरियाने प्रथमच असे ड्रोन पाठवल्याने दोन्ही देशांतील तणावात भर पडली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा