पालघर : अभिनेत्री तुनीशा शर्माच्या हत्येप्रकरणी तिचा प्रियकर शेझान खान याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी शनिवारी देण्यात आली. तुनीशाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यता आला आहे.

शेझान खान याला वसईतील जिल्हा दंडाधिकारी यांच्यासमोर पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे शनिवारी हजर करण्यात आले. तेव्हा त्याला14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. शेझानला पालघर जिल्ह्यातील वळीव पोलिसांनी 26 डिसेंबर रोजी अटक केली होती. तसेच तुनीशाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

वसई येथे अलीबाबा दास्तान ए काबुल या मालिकेचे वसई येथे 25 डिसेंबर रोजी चित्रीकरण सुरू होते. तेव्हा तुनीशाने तेथील स्वच्छतागृहात आत्महत्या केली होती. आत्महत्येस शेझान कारणीभूत असल्याची तक्रार तुनीशाच्या आईने दिली होती. त्यानंतर पोलिसांनी शेझानला अटक केली होती. चित्रीकरणादरम्यान त्याने माझ्या मुलीला थप्पड मारली होती. तसेच तो तिला उर्दू शिकवत होता. तिने हिजाब घालावा, असा आग्रह धरत होता, असेही आईने सांगितले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा