इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर जिल्हयात एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना झाला आहे. त्यांच्या चाचणीचा निष्कर्ष शनिवारी आले. नमुने आता जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवले गेले आहेत.
कोरोना झालेल्यामध्ये 45 वर्षीय पुरूष, त्याची पत्नी आणि दोन मुली अनुक्रमे 12 आणि सात वर्षांच्या आहेत. अगरवाल नगर परिसरात ते राहतात. चाचणीत त्यांना कोरोना झाल्याचे उघड झाले, अशी माहिती जिल्ह्याचे पाहणी अधिकारी डॉ आमित मालकर यांनी दिली.
डॉ. मालकर म्हणाले, त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांचे नमुने अधिक तपासणीसाठी घेतले होते. त्यांच्या संपर्कात आणखी कोणी आले होते का ? याचा तपास केला जात आहे. सर्वांचे नमुने जनुकीय क्रम निर्धारणासाठी पाठवले गेले आहेत. दरम्यान, या अगोदर ज्यांना कोरोना झाला होता. तसेच जे बरे झालेले आहेत त्यांना घरी सोडले आहे. दरम्यान, मध्य प्रदेशात आतापर्यंत 10 लाख 54 हजार 919 रुग्ण आढळले असून 10 हजार 766 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 10 लाख 44 हजार 138 जण बरे झाले असून त्यांना घरी सोडले आहे. त्यामुळे संक्रमित रुग्णांची संख्या पाच एवढी आहे.