प्रवाशांना चाचणी, लशीचेही बंधन
पॅरिस : चीनमधील कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर युरोपातील राष्ट्रांनी आता कोरोनाचे नियम कठोर केले आहेत. त्यामध्ये फ्रान्स, स्पेन आणि ब्रिटन यांचा समोश असून चीनमधून विमानातून येणार्या प्रवाशांसाठी ते लागू केले आहेत. त्यामध्ये कोरोनाची चाचणी आणि लसीकरण बंधनकारक केले आहे.
फ्रान्स सरकारने प्रवासी कोरोनामुक्त असल्याचा अहवाल द्यावा तसेच अत्यावश्यक असेल तरच चीनचा प्रवास करावा, असे बजावले असून चीन आणि फ्रान्स दरम्यान विमान प्रवासात मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. चीनमधून येणार्या प्रवाशाची पीसीआर चाचणी करण्यास सुरूवात केली. रविवारपासून ही नियम कडक केली जाणार आहे.
ब्रिटन सरकारने जाहीर केले की, चीनकडून इंग्लंडला थेट येणार्या प्रवाशांना 5 जानेवारीपासून कोरोना चाचणी बंधनकारक आहे. ब्रिटनचे आरोग्य मंत्री स्टीव्ह बर्कले म्हणाले, काळजी संतुलित पद्धतीने घेतली जात आहे. कोरोनाची नियमावली तात्पुरती आहे. फ्रान्स आणि स्पेनने कोरोनाचे नियम युरोपात राबविले जाणार आहे.
दरम्यान, फ्रान्समध्ये सलग तिसर्यांदा हंगामी तपाचे रुग्ण वाढले असून गेल्या काही आठवड्यात खोकला, कोरोनाचे रुग्णांनी रुग्णालये भरुन वाहिली आहेत. दुसरीकडे स्पेनने चीनमधून येणार्या प्रत्येक प्रवाशाकडे त्याला कोरोना नसल्याचे चाचणीचे पुरावे द्यावे लागणार आहेत. चीनमध्ये कोरोनाने डोके पुन्हा वर काढल्यमुळे हा निर्णय घेतल्याचे आरोग्य मंत्री कॅरोलीना दारियस यांनी सांगितले. विमानतळावर कोरोनाविषयक चाचण्या केल्या जात आहेत.