पाटणा : भाजपचे उपाध्यक्ष राजीव रंजन यांनी शुक्रवारी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्‍का बसला आहे. राजीव रंजन यांनी राजीनामा देत असल्याचे प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहून कळवले आहे. राजीनामा स्वीकारून जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

पत्रात राजीव रंजन यांनी लिहिले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदर्शांपासून बिहार भाजप दूर झाली आहे. ’सबका साथ-सबका विकास’ ही पंतप्रधानांची घोषणा केवळ शब्दातच राहिली आहे. आज पक्षावर मागास/अधिक मागास आणि दलितविरोधी घटकांचे वर्चस्व आहे. मागासलेल्या समाजाचे नसलेले नेतेही या समाजाच्या नावावर सत्ता उपभोगत आहेत. प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल म्हणाले की, राजीव रंजन यांना यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल ताकीद दिली होती; पण त्यांच्या सुधारणा झाली नव्हती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा