पालघर : अभिनेता शेझान खान याने माझ्या मुलीला फसविले. तिचा वापर करुन घेतला, अशी संतप्‍त प्रतिक्रिया अभिनेत्री तुनीशा शर्माच्या आईने सोमवारी दिली.

पालघर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी तुनीशाने वसई येथील चित्रीकरण स्थळातील स्वच्छतागृहात गळफास घेत आत्महत्या केली होती. तिला शेझान खानने आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार तुनीशाच्या आईने वळीव पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर शेझानला पोलिसांनी अटक केली होती. तसेच त्याला पोलीस कोठडीही न्यायालयाने सुनावली होती. या पार्श्‍वभूमीवर तुनीशाच्या आईने माध्यमांसमोर आपल्या भावनांना वाट करुन दिली.

त्या म्हणाल्या, माझ्या मुलीला शेझान खाने फसविले आहे. त्याने तिला विवाह करण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु त्याचे दुसर्‍या मुलीशी संबंध होते. तसेच तुनीशाला सुद्धा भेटत होता. तुनीशाचा त्याने तीन ते चार महिने वापर केला. त्याच्यामुळेच माझी मुलगी गेली.त्याला सोडता कामा नये. त्याला कठोरात कठोर शिक्षा द्या. पोलीस सध्या दोघांमधील व्हॉट्सअप चॅट आणि मोबाइल रेकॉडींग तपासून पाहत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. तुनीशा गर्भवती होती का ? या प्रश्‍नावर ते म्हणाले, तसे संकेत प्राथमिक तपासात मिळालेले नाहीत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा