नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेच्या बदनामीसाठीच ‘कोव्हिड नाट्य’ सुरू असल्याची टीका अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नुकतेच एक पत्र पाठविले. या पत्रात त्यांनी भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचे पालन करा, अथवा यात्रा थांबवा, असे म्हटले आहे. त्यावरून, काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील मोदी सरकारवर टीका केली आहे.

Copyright © 2021 Kesari || Developed by Gigante Technologies Pvt Ltd. || Digital Marketed By MIDM - Master In Digital Marketing