मुंबई : राज्यात लवकरच तलाठी आणि मंडळ अधिकार्‍यांची पदभरती होणार आहे. ज्यामध्ये 3 हजार 110 तलाठी पदासांठी, तर मंडळ अधिकार्‍यांची 511 पदांसाठी भरती होणार आहे. महसूल विभागाच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. राज्य शासनाने याबाबत आदेश काढला आहे. डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारी महिन्यात या भरतीबाबत जाहिरात निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा