इस्लामाबाद : अफगाणिस्तानात रसत्याकडेला ठेवलेल्या बाँबचा स्फोट मंगळवारी सकाळी झाला. त्यात सहा जण ठार झाले आहेत. उत्तर अफगाणिस्तानातील बसजवळ हा स्फोट झाला.

सरकारी कर्मचारी कामावर जाण्याची तयारी करत होते. तेव्हा बसजवळ रस्त्याकडेला ठेवलेल्या बाँबचा स्फोट झाला. तालिबान सरकारचे प्रवक्‍ते मोहम्मद वाझिरी यांनी सांगितले की, बालीख प्रांतातील मजार ए शरीफ येथे हा स्फोट झाला आहे. त्यात सात जखमी झाले आहेत. हा बॉब रस्त्याकडेला उभ्या असलेल्या बैलगाडीत ठेवला होता. तेव्हाच बस या मार्गावरुन जात असताना धमाका झाला. या स्फोटात हिराटीन गॅस आणि पेट्रोलियम विभागाच्या कर्मचार्‍यांना लक्ष्य करण्यात आल्याचे दिसते. हा सफेट इस्लामिक स्टेट खोरसानच्या दहशताद्यांनी केला असल्याची शक्यता असून अद्यापी कोणीही स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा