नवी दिल्ली : अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड गुजरातमध्ये तिसरा संयुक्त वीज प्रकल्प सुरू करणार आहे. हवा आणि सौर उर्जेचा वापर करुन सुमारे 450 मेगवॉट विजेची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे कंपनी 1 हजार 440 मेगावॉट विजेची निर्मिती करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी ठरणार आहे.
जैसलमेर येथे हवा आणि सौर उर्जा निर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पातून तयार झालेली वीज दोन रुपये 67 पैसे प्रति युनिटप्रमाणे 25 वर्षांपर्यंत खरेदी करण्याच्या करारारावर स्वाक्षर्या देखील झाल्या आहेत. सौर उर्जेतून 420 मेगावॉट तर पवनचक्कीतून 105 मेगावॉट विजेची निर्मिती होणार आहे.
कंपनीने जैसलमेर येथे मे 2022 मध्ये भारतातील पहिला 390 मेगावॉट क्षमतेचा आणि दुसरा 600 मेगावॉटचा संयुक्त वीज निर्मिती प्रकल्प कार्यन्वित केला होता. त्यामुळे तिन्ही प्रकल्पांतून 1 हजार 440 मेगावॉट विजेची निर्मिती होणार असून, कंपनीच्या प्रकल्पांची एकूण निर्मिती क्षमता 7.17 गीगावॉट एवढी झाली आहे. अपारंपरिक उर्जा क्षेत्रात कंपनी जगातील सर्वात मोठी ठरली आहे. याशिवाय अनेक प्रकल्प तयार होण्याच्या मार्गावर असून 20.6 गीगावॉटच्या एकूण वीज निर्मितीचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे.