प्रति पिंप ६० डॉलरला रशियाचा विरोध

ब्रसेल्स : युक्रेन आणि रशिया यांच्या गेल्या ९ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. त्याचे परिणाम कच्च्या तेलाच्या किमती आणि निर्यातीवर होत आहेत. रशिया स्वस्तात तेलाच विक्री करुन मिळणार्‍या पैशाचा वापर युद्धासाठी करेल, या भीतीमुळे अमेरिका, युरोपिय महासंघ आणि नाटो राष्ट्रांनी रशियाचे तेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला असून विविध निर्बंधही रशियावर लादले आहेत. त्या अंतर्गत आता रशियाच्या तेलाच्या किमती प्रति पिंप 60 डॉलर निर्धारित केल्या आहेत. त्याला रशियाने जोरदार विरोध केला असून ही किमत अमान्य केली. त्यामुळे रशियन तेलाच्या किंमतीचे युद्ध आता सुरू झाले आहे.

विशेष म्हणजे जी 7 या राष्ट्रांनी सुद्धा आता रशियाच्या तेलावर निर्बंध लागू करताना तेलाच्या प्रति पिंपाचा दर 60 डॉलर हा निश्‍चित केला आहे. त्याला युरोपीय महासंघाने पाठिंबा दिला आहे. अशा पद्धतीने तेलाची किंमत निर्धारित करुन जगभरातील तेलाच्या किमती कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे रशियाने भारत, चीनसह अन्य आशियाई देशांना स्वस्त दरात तेलाचा पुरवठा सुरू केला आहे. पण, अन्य राष्ट्रांनी रशियावर निर्बंध कडक करताना तेल खरेदी करणार नाही, अशी भूमिका घेतली असून तेलाची किंमत 60 डॉलर प्रति पिंप निश्‍चित केली आहे. ही बाब रशियाला अमान्य आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सांगितले की, या दरात तेल आम्ही विकणार नाही. अशा पद्धतीने किमती ठरविणार्‍या देशांना चोख उत्तर दिले जाईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा