नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत सोन्या आणि चांदीच्या दरात सोमवारी घसरण झाली. सोने प्रति दहा ग्रॅम 61 रुपयांनी तर चांदी प्रति किलो 146 रुपयांनी घसरली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती घटल्याने त्याचे परिणाम भारतातही झाले.
सुरूवातीला सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 52 क्षजार 833 रुपये होता. त्यानंतर 61 रुपयांची घट झाल्याने तो 52 हजार 822 रुपये झाला. ूदुसरीकडे चांदीचे दर प्रति किलो 146 रुपयांनी घसरून त्याची किमत 61 हजार 855 रुपये झाली. सध्या रुपयांची घसरगुंडी सुरू आहे. तसेच लग्नसोहळ्यांचे दिवस असून मागणी कमी आहे. त्यामुळे देशांतर्गत सोन्याच्या किमती कमी झाल्याची माहिती एचडीएफसी सिक्युरिटीचे विश्लेषक दिलीप परमार यांनी दिली. चीनमध्ये शुन्य कोव्हिड धोरण कठोरपणे राबविले आहे. त्यामुळे तेथे जनतेत असंतोष पसरला असून निदर्शने होत आहेत. त्यामुळे डॉलर अधिक मजबूत होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. निदर्शने संपताच तेथे सोन्याला मागणी वाढेल, असेही परमार म्हणाले.