मुंबई : महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात. पण काही नाही घातले नाही तरी त्या सुंदर दिसतात, असे विधान योगगुरू रामदेव बाबा यांनी केले आहे.
रामदेव बाबा ठाण्यातील योगा कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
ते म्हणाले, अमृता फडणवीस यांना तरुण राहण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे, की त्या शंभर वषार्ंपर्यंत म्हातार्‍या होणार नाहीत. त्या नेहमीच तोलूनमापून खातात, खूश राहतात. त्या लहान मुलांप्रमाणे हसत असतात. साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिले, तर काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात. रामदेव बाबा यांच्या वक्‍तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, महिलांच्या योग प्रशिक्षणानंतर महिलांसाठी महासंमेलन झाले. तेव्हा महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. यावर रामदेव बाबा म्हणाले की, साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा. पुढे ते म्हणाले की, महिला साड्या, सलवारमध्ये चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने काही नाही घातलें तरी त्या चांगल्या दिसतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा