दिल्‍ली उच्च न्यायालयाचा निकाल
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांचा दमदार आवाज, नाव, छायाचित्र पूर्वपरवानगीशिवाय वापरणे किंवा व्यक्‍तिमत्वाचे अनुकरण करण्यावर कायद्याने बंदी आली आहे. कारण त्यांनी याबाबत केलेल्या अर्जावर दिल्‍ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली असून, त्यावर निकाल देण्यात आला आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या बौद्धिक संपत्तीच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जामध्ये अमिताभ यांनी आपलं नाव, प्रतिमा, आवाज आणि व्यक्तिमत्त्वाच्या गुणधर्मांना संरक्षण मिळावे असे नमूद केले होते. न्यायाधीश नवीन चावला यांनी अर्जावर सुनावणी केली. तेव्हा अमिताभ यांच्या परवानगीशिवाय त्यांचे छायाचित्र, त्यांचा आवाज आणि त्यांचे नाव आता वापरता येणार नाही. न्यायालायाच्या निर्णयामुळे बच्चन यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा