मुंबई : दिशा सालियन हिचा मृत्यू घातपात नव्हे तर अपघाती होता, असे केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) अहवालातून स्पष्ट झाले आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या पाच दिवस आधी दिशाचा मृत्यू झाला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तसेच भाजपच्या अनेक नेत्यांनी या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. राणेंसह भाजपच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांची माफी मागावी, अशी मागणी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. दिशाच्या मृत्यूनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. दिशाचा दारुच्या नशेत तोल गेल्याने आणि 14 व्या मजल्यावरून पडून डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे सीबीआयच्या अहवालात म्हटले आहे. 8 जून 2020 रोजी ही घटना घडली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा