दोहा : फुटबॉल विश्‍वचषकात डेन्मार्क आणि ट्युनिशिया यांच्यात मंगळवारी खेळला गेलेला सामना गोलरहित बरोबरीत संपला. या गट-ड सामन्यात दोन्ही संघांनी चांगला खेळ केला. मात्र सर्व प्रयत्न करूनही त्यांना गोल करता आला नाही. अपेक्षेच्या विरुद्ध ट्युनिशियाच्या संघाने डेन्मार्कवर वर्चस्व गाजवत त्यांना गोल करू दिला नाही. या सामन्यात डेन्मार्कला एकूण 11 कॉर्नर मिळाले; पण एकही गोल करता आला नाही. या विश्वचषकातील हा पहिला गोलरहित सामना होता. दोन्ही संघांनी प्रत्येकी एकदा गोल केला होता; पण तो ऑफ साइड घोषित करण्यात आला.पूर्ण वेळेनंतर अतिरिक्त वेळेत डेन्मार्कला पुन्हा संधी मिळाली, पण यावेळीही ट्युनिशियाच्या गोलरक्षकाने त्याचा प्रयत्न हाणून पाडला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा