युक्रेनच्या रुग्णालयावर रशियाचा हल्‍ला

कीव्ह : रशियाने बुधवारी युक्रेनच्या दक्षिण भागातील रुग्णालयावर जोरदार रॉकेट ह्ल्‍ले चढवले. त्यात नवजात अर्भकाचा मृत्यू झाला असून बाळंतीण आणि डॉक्टरांना ढिगार्‍याखालून वाचविण्यात यश मिळाले आहे.

विभागाचे राज्यपाल यांनी सांगितले की, रशियाच्या रॉकेटचा वापर या हल्ल्यात केला. झापोरझ्झापिया शहराजवळच्या विलान्सक येथे हल्‍ले झाले आहेत. या हल्ल्यात रुग्णालयाच्या इमारतीचे नुकसान झाले. तसेच अन्य वैद्यकीय सेवा देणार्‍या विभागांचा त्यात समावेश आहे. या आठवडयात रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सलग दहाव्या महिन्यांत सुरू आहे.

9 मार्च रोजी अशाच प्रकारचा हल्‍ला मायरिपोल शहरातील रुग्णालयावर केला होता. त्यानंतरचा रुग्णालयावर होणारा हा मोठा हल्‍ला होता. रात्री रशियाचे एक मोठा रॉकेट रुग्णालयातील लहान प्रसूती खोलीवर कोसळले. तेव्हा आगीचे आणि धुराचे लोट आकाशात उसळले. सकाळी मदतकार्य राबविले तेव्हा अर्भकाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. इमारतीच्या ढिगार्‍याखालून बाळंतीण आणि एका डॉक्टरची सुटका केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा