नेपियर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे भारताने ही मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. वास्तविक या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसर्‍या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 65 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता.

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ 19.4 षटकात 160 धावांवर गारद झाला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने 9 षटकांत 75 धावांत 4 फलंदाज गमावले होते. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबला आणि डकवर्थ लुईस नियमानुसार, भारताला विजयासाठी 9 षटकात 76 धावांची गरज होती, परंतु सामना थांबवण्यात आला तेव्हा भारताची धावसंख्या 75 होती. अशा प्रकारे सामना अनिर्णित राहिला. मात्र, भारतीय संघ मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला.

तत्पूर्वी, भारतीय गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा संघ 19.4 षटकांत 160 धावांवर गारद झाला. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांनी 4-4 बळी घेतले. अर्शदीप सिंगने 4 षटकांत 37 धावांत 4 खेळाडू बाद केले. तर मोहम्मद सिराजने 4 षटकात 17 धावा देत 4 बळी घेतले. याशिवाय हर्षल पटेलला 1 यश मिळाले.

भारताचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. सूर्यकुमार यादवने तिसर्‍या टी-20 सामन्यात 10 धावांची खेळी खेळली, पण दुसर्‍या सामन्यात त्याने नाबाद 111 धावांची खेळी केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा