मेलबर्न : येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसर्‍या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 221 धावांनी पराभव केला. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित 48 षटकात 355/5 धावा केल्या. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडला 364 धावांचे लक्ष्य मिळाले, ज्याचा पाठलाग करताना संपूर्ण संघ 32 व्या षटकात 142 धावांवर गारद झाला.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला त्याच्या 152 धावांच्या दीड शतकी खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याच वेळी, त्याचा जोडीदार डेव्हिड वॉर्नर त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 48 षटकांत 5 बाद 355 धावा केल्या. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांनी शतक झळकावले ट्रेविस हेडने 152 धावांचे तर डेव्हिड वॉर्नरने 106 धावांचे योगदान दिले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा