तब्येतीची केली विचारपूस

मुंबई : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ’भारत जोडो’ यात्रेने रविवारी महाराष्ट्राचा निरोप घेतला. त्यानंतर राहुल गांधी गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी रविवारी रात्री राऊतांना फोन केला, त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

’भारत जोडो’ मध्ये व्यस्त असूनही राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती, असे म्हणाले. राजकारणातील सहकार्‍यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दु:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतोय, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

शिवसेनेने सावरकरांच्या हिंदुत्वाचा कायमच पुरस्कार केला आहे. भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असताना जुने वाद उकरून काढले जात आहेत, भाजपने राजकारणासाठी हा मुद्दा उचलला आहे, असे राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा