दोहा : कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी इराण संघाच्या खेळाडूंनी राष्ट्रगीत न गाता देशात सुरु असलेल्या हिजाब विरोधी आंदोलनाला पाठींबा दर्शविला.

संपूर्ण इराण संघाने देशाच्या सरकारविरोधात सुरू असलेल्या निदर्शनांना पाठिंबा देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. इराण फुटबॉल संघाचा कर्णधार अलिरेझा जहांबख्श यांनी सामन्यापूर्वी सांगितले की, संघाचे सर्व खेळाडूंनी सरकारविरोधी निदर्शनांच्या समर्थनार्थ राष्ट्रगीत न गाण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यापूर्वी इराणचे राष्ट्रगीत वाजले तेव्हा खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये इराणचे 11 खेळाडू राष्ट्रगीत न गात गंभीर मुद्रेत उभे होते. यावेळी सर्व खेळाडू भावुक झाले होते.

16 सप्टेंबर रोजी इराणमध्ये महसा अमिनी (22) हिचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण इराणमध्ये सरकारविरोधात निदर्शने सुरू आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा