नवी दिल्ली : पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या नावावर मैदानाबाहेरही मोठा विक्रम नोंद झाला आहे. रोनाल्डो इंस्टाग्रामवर 50 कोटी फॉलोअर्स असलेला जगातील पहिला व्यक्ती बनला आहे.

यामध्ये रोनाल्डोनंतर अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी दुसर्‍या स्थानावर आहे. त्याचे 34.6 कोटी फॉलोअर्स आहेत. रोनाल्डोची क्रेझ फक्त इंस्टाग्रामवरच नाही. ट्विटरवरही त्यांचे करोडो फॉलोअर्स आहेत. रोनाल्डोचे ट्विटरवर 10.5 कोटी फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर रोनाल्डो आणि मेस्सीनंतर फॉलोअर्सच्या बाबतीत अमेरिकेची मॉडेल कायली जेनर तिसर्‍या स्थानावर आहे. त्याचे 3.46 कोटी फॉलोअर्स आहेत. अमेरिकेची गायिका सेलेना गोमेझ चौथ्या आणि अभिनेता ड्वेन जॉन्सन चौथ्या स्थानावर आहे. भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली 2.3 कोटी फॉलोअर्ससह सातव्या स्थानावर आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा