चिरंजीविला प्रभावी व्यक्‍तिमत्वाचा पुरस्कार

पणजी : गोव्यात रविवारपासून 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली. या सोहळ्यास जगभरातील कालाकार उपस्थित होते. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरूगन उपस्थित होते. तसेच अभिनेते अजय देवगण, कार्तिक आर्यन, पंकज त्रिपाठी, मनोज वाजपेयी, सुनील शेट्टी, वरुण धवन आणि सारा अली खान उपस्थित होत्या. दरम्यान, भारतीय चित्रपटसृष्टीतील यंदाचा प्रभावी व्यक्‍तिमत्वाचा पुरस्कार अभिनेता चिरंजीवी यांना जाहीर झाला आहे.

दरम्यान, अनुराग ठाकूर यांनी या वेळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांचा आरआरआर हा 2022 मधील भारतातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे.

ते म्हणाले, प्रादेशिक चित्रपट आणि अन्य चित्रपट ज्यांना कुठेच व्यासपीठ मिळत नाही, असे चित्रपट गोव्यातील महोत्सवात पोहोचतात.दरम्यान, यावेळी अल्मा ऑस्कर चित्रपटाच्या कलाकारांनी उपस्थिती लावली. इंडियन पॅनोरमा विभागात देशभरातील 45 चित्रपटांचे प्रदर्शन होत असून यात मराठी, कोकणीसह अन्य भाषांतील चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत. यंदा 79 देशांतील तब्बल 280 चित्रपटांसह सुमारे 500 चित्रपटांच्या रिल रसिकांसाठी रविवारपासून खुल्या झाल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा