हावडा : बंगाली चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री एंड्रिला शर्माचे रविवारी वयाच्या 24 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून एंड्रिला शर्मा कोमात होती. तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

एंड्रिलाची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. 15 नोव्हेंबरला तिला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर तिने प्रकृती आणखीनच बिघडली. तिला सीपीआरही देखील देण्यात आला होता. त्यानंतर ती अनेक दिवस व्हेंटिलेटरवर होती. एंड्रिलाच्या सीटी स्कॅन रिपोर्टमध्ये तिच्या डोक्यात रक्ताच्या गाठी झाल्याचे समोर आले आहे.

एंड्रिलाच्या डोक्याच्या ज्या भागावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्याच्या विरुद्ध बाजूस गाठी होत्या. या अगोदर एंड्रिलाला 2 वेळा कर्करोगदेखील झाला होता. काही दिवसांपूर्वी तिला पक्षाघाताचा झटका आला होता, त्यामुळे तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्या होत्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा