मुंबई : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मैं रहू या ना रहू यश देश रेहना चाहिये -अटल, असे चित्रपटाचे नाव असून त्यात पंकज त्रिपाठी वाजपेयी यांची भूमिका करणार आहेत.

उत्कर्ष नैथानी यांची पटकथा असून तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजीव जाधव दिग्दर्शक आहेत. त्यांनी नटरंग, बालगंधर्व अशा गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. त्यामुळे वाजपेयी यांच्यावरील चित्रपटही रसिकांना भावेल, असा अंदाज व्यक्‍त केला जात आहे. चित्रपटाचे संपूर्ण कथानक वाजपेयी यांच्या सभोवताली फिरते. तसेच त्यांच्या जीवनातील प्रसंगाचे दर्शन घडविणारे असणार आहेत. त्रिपाठी भूमिकेला न्याय देतील, असा विश्‍वास जाधव यांनी व्यक्‍त केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा