नवी दिल्‍ली : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसमध्ये पुन्हा एकोपा वाढत आहे, असे पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले.

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते. यात्रेमुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर झाली आहे. त्यांच्यामध्ये पुन्हा चैतन्य वाढू लागले आहे. पक्ष वाढीसाठी ही यात्रा पोषक ठरत चालली आहे. राहुल गांधी हे नेते आणि जनतेच्या संपर्कात पुन्हा येत असून ते जनतेशी संवाद साधत आहे. त्यामुळे पक्षाचे विचार पुन्हा जनतेसमोर नव्या दमाने येत आहेत. विविध राज्यांतून यात्रा जात आहे. तेथे चांगला प्रतिसादही मिळत आहे. ही बाब काँग्रेसच्यादृष्टीने महत्त्वाची ठरत आहे, असेही रमेश यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा