श्रीनिवास रामानुजन यांच्या तोडीचे जागतिक कीर्तीचे गणितज्ञ वसिष्ठ नारायण सिंह यांचा 14 नोव्हेंबर (आज) दुसरा स्मृतिदिन. दोन वर्षापूर्वी पटना येथे प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले होते. विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या गाजलेल्या ऊर्जा = वस्तुमान ÷ प्रकाशाचा वेग 2 (ए=ाल2) या जगप्रसिद्ध सिद्धांताला एके काळी आवाहन देणारे व ‘नासा’च्या चंद्रावर मानव पाठविण्याच्या ऐतिहासिक मोहिमेदरम्यान संगणक बंद पडल्यानंतर संगणकाच्या गतीने आणि अचूकतेने आकडेमोड करणारे वसिष्ठ केवळ भारताचेच नव्हे तर जगातील आजच्या युगातील ‘आर्यभट्ट’ होते. पण दुर्दैवाने देशात काय, बिहारातही ते फारसे कुणाला माहीत नसतील. त्यांना कुणी गणित क्षेत्रातील देव समजत, तर कोणी गणिताचा जादूगार. त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून देण्याचा हा प्रयत्न …..

भारतामध्ये श्रीनिवास रामानुजन यांच्या तोडीचे काही जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होऊन गेले. दुर्दैवाने ते उपेक्षित राहिले आणि त्यांच्या कार्याची ओळख आणि महत्व यापासून देशवासी अनभिज्ञ राहिले. एके काळी गणितात अग्रस्थानी असणार्‍या भारतात आज गणित एक कठीण आणि गंभीर विषय समजला जातो. महाराष्ट्रातील डहाणूचे रँग्लर परांजपे पारितोषिक विजेते आणि मजेशीर संख्यांचा शोध लावणारे द. रा. कापरेकर असोत वा भोजपूर, बिहारचे वसिष्ठ नारायण सिंह असोत, त्यांना दुर्लक्षित केल्याने त्यांच्या प्रतिभेचा योग्य लाभ घेता आला नाही, हेच खरे. देशात संशोधनासाठी पूरक वातावरण नसल्यानेच देश आज संशोधन क्षेत्रात पिछाडीवर आहे.

महान गणितज्ञ वसिष्ठ नारायण सिंह यांचा जन्म बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील बसंतपूर या गावात 2 एप्रिल 1942 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नेतरहाट विद्यालयात पूर्ण झाले तर लहानपणापासूनच तल्लख बुद्धीचे असणार्‍या वसिष्ठ यांना पाटणा कॉलेजमध्ये प्रथम वर्षीच बी.एस.सी. ऑनर्सची परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली होती. येथे ते ‘वैज्ञानिकजी’ नावानेच ओळखले जात. महाविद्यालयात शिक्षकांच्या अनेक चुका ते दाखवत. त्यामुळे प्राचार्यावर वसिष्ठ यांची स्वतंत्र परीक्षा घेण्याची वेळही आली होती, तथापि त्यात त्यांनी विक्रमी यश मिळविले. याच दरम्यान अमेरिकी गणितज्ञ जॉन केली पाटण्यात व्याख्यानासाठी आले असता त्यांनी काही गणिती कूटप्रश्न मांडले असता श्रोत्यांपैकी वसिष्ठ यांनी क्षणार्धात सर्व कूट प्रश्न सोडविल्याने चकित झालेल्या केली यांनी त्यांना अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले. त्यानंतर 1969 मध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी ‘रिप्रोड़्यूसिंग केर्नेल्स अ‍ॅण्ड ऑपरेटर्स विथ सायक्लिक व्हेक्टर’ (ठशिीेर्वीलळपस घशीपशश्री रपव जशिीरीेीीं ुळींह र उूलश्रळल तशलीेीं) या विषयावर पीएच.डी. संपादन केली आणि याच विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक झाले. बर्केल विद्यापीठाने त्यांना ’जीनियसोंका जीनियस’ असे म्हंटले होते. त्यानंतर नासामध्ये ते असोसिएट साइंटिस्ट प्रोफेसर पदावर रुजू झाले. मात्र, अमेरिकेत न रमता ते भारतात आले आणि कानपूरच्या आयआयटी कॉलेज, टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई, भारतीय सांख्यिकी संस्था कोलकाता या संस्थांत त्यांनी काम केले. मात्र, पाच वर्षांनंतर त्यांना अचानक सीजोफ्रेनिया (व्यक्तिमत्त्व दुभंगाच्या) या मानसिक आजाराने गाठले आणि त्यानंतर काही काळ ते बेपत्ता झाले. पाटण्यातील एका अपार्टमेंटमध्ये चाळीस वर्षे ते मनोदुभंगाने पछाडलेल्या अवस्थेत जीवन जगले. मात्र पुस्तके, पेन्सिल नेहमीच त्यांच्या सोबतीला होती.

त्यांचा एकूणच जीवनप्रवास गणितज्ञ जॉन नॅश यांची आठवण करून देणारा आहे. तथापि, पाश्चात्त्य देशात प्रतिभावंतांची जी कदर होते ती आपल्याकडे होत नसल्याने त्यांच्यासारखा प्रज्ञावंत अकालीच झाकोळला गेला. संगणकाशी स्पर्धा करणारी बुद्धिमत्ता लाभलेल्या वसिष्ठ बाबूंना पुस्तकाविषयी प्रचंड प्रेम होते. जेव्हा अमेरिकेहून ते भारतात परत आले तेव्हा आपल्या सोबत त्यांनी दहा पेट्या पुस्तके आणल्याचे सांगितले जाते. ‘गणित हे सौदर्याचा आद्य नमुना आहे’ या प्रसिद्ध खगोलशास्त्री योहान केप्लर यांच्या सुप्रसिद्ध वचनाची वसिष्ठांच्या गणितातील शोधाकडे पाहिल्यास प्रचीती येते. निधनानंतरही त्यांच्या वाट्याला अवहेलनाच आली. त्यांच्या निधनाने, गणित क्षेत्राची अपरिमित हानी झाली असून गणिताबद्दलची गोडी वाढविणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.

विजय कोष्टी, कवठे महांकाळ (सांगली)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा