मुंबई : अभिनेता शाहरुख खान आज एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. मुंबई विमानतळावर त्याची अडवणूक करण्यात आली.

शाहरुख खान शनिवारी शारजाहवरून परत येत असताना त्याला सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी रोखले आणि त्याची चौकशी केली. सीमा शुल्क न भरल्याने ही चौकशी करण्यात आली आहे. एअर इंटेलिजेंस युनिट (AIU) च्या सूत्रांनुसार त्याच्याकडे महागडया घडाळ्यांची कव्हर्स होती ज्याची किंमत जवळपास १८ लाख आहे, ज्याचे सीमा शुल्क आहे ६.८३ लाख. अभिनेत्याने ही रक्कम दंड स्वरूपात भरली असून सीमा शुल्क अधिकाऱ्यांना सहकार्यदेखील केले आहे. शाहरुख खान ४१ व्या शारजाह इंटरनॅशनल बुक फेअर या कार्यक्रमातून परतत होता.

शाहरुख खानला शुक्रवारी शारजाहमधील एक्स्पो सेंटरमधील पुस्तक मेळ्यात उपस्थित असताना ग्लोबल आयकॉन ऑफ सिनेमा अँड कल्चरल नॅरेटिव्ह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाहरुख खान पठाणच्या बरोबरीने ‘जवान’ ‘डंकी’ या चित्रपटात दिसणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा