मुंबई : सेबीने बॉम्बे डाईंग अ‍ॅन्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कंपनीचे नस्ली वाडिया, नेस वाडिया आणि जहाँगिर वाडिया यांना शेअर बाजारात व्यवहार करण्यास दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, सेबीच्या निर्णयाविरुद्ध बॉम्बे डाईंग कंपनी सेबी लवादाकडे दाद मागणार आहे. कंपनीने आर्थिक ताळेबंद चुकीचा सादर केला, तसेच गैरव्यवहार केल्याचा ठपका सेबीने ठेवला आहे. 15 कोटी 75 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंड भरण्यासाठी 45 दिवसांची मुदत दिली आहे. याबाबतचा आदेश सेबीने नुकताच दिला. या प्रकरणी सेबीकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर बंदी आणि दंडात्मक कारवाईचा आदेश देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा