ब्रिस्बेन: टी-20 विश्वचषकाला ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवात झाली असून पात्रता फेरीतील सामने आणि सराव सामने या आठवड्यात खेळले जात आहेत. सुपर-12 चे सामने हे 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून 23 तारखेला भारत वि पाकिस्तान सामन्याने भारतीय संघाची सुरुवात होणार आहे. पण यादरम्यान वेगवेगळ्या संघांचे सराव सामने खेळले जात होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिला सराव सामना जिंकल्यानंतर भारताला काल दुसरा सराव सामना न्यूझीलंडसोबत खेळणार होता मात्र पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. टी-20 विश्वचषक 2022 मध्ये काल भारताचा न्यूझीलंडबरोबर दुसरा सराव सामना होणार होता. पण धुव्वाधार पावसामुळे सामना होऊ शकला नाही. ब्रिस्बेनमध्ये नाणेफेकही न होता सामना रद्द करण्यात आला. ऑस्ट्रेलियावरील रोमहर्षक विजयानंतर भारतीय संघ बुधवारी टी-20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा सराव सामन्यात मुकाबला करणार होता. डेथ ओव्हरमधील चुका सुधारण्यासाठी संधी कालच्या सामन्यात भारताकडे होती, परंतु पावसाने व्यत्यय आणला आणि त्यामुळे भारत-न्यूझीलंड हा सराव सामना रद्द करावा लागला. भारतीय संघ थेट 23 ऑक्टोबरला पाकिस्तानचा सामना करणार आहे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा