मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले.

यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकर्‍यांना बसला आहे. नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करावे.जिल्हाधिकार्‍यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकर्‍यांना तातडीने मदत देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. एनडीआरएफच्या निकषात न बसणार्‍या शेतकर्‍यांनाही सरकारने तब्बल साडेसातशे कोटींची मदत दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा