कोलकाता : पश्‍चिम बंगालचे माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांची शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणात अलीपूर येथील विशेष सीबीआय न्यायालयाने 19 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवली. त्यामुळे चॅटर्जी यांचा कोठडीतील मुक्काम आणखी वाढला आहे. चॅटर्जी यांच्यासमवेत पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष कल्याणमय गांगुली, पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोगाचे (एसएससी) माजी सचिव अशोक साहा आणि एसएससीचे माजी सल्लागार एस.पी सिन्हा यांच्या कोठडीतही न्यायालयाने 19 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुप्तचर विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा