‘विरे दी वेडिंग’ या चित्रपटाप्रमाणे प्राइम व्हिडिओच्या ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ या वेबसीरिजला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. या सीरिजच्या दोनही सीझनप्रमाणे येणारा नवा सीझनही प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असल्याचे स्पष्ट झाले. प्राइम व्हिडिओने ‘फोर मोर शॉट्स प्लीज!’ या एमी पुरस्कारांसाठी नामांकन पटकावणाऱ्या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. ही सीरिज २१ ऑक्टोबर रोजी भारत आणि आणखी २४० देशात प्रसारित होणार आहे.

जोयीता पटपटिया यांचे दिग्दर्शन, देविका भगत यांचे लेखन आणि इशिता मोईत्रा यांचे संवाद असलेली ही बहुप्रतिक्षित अमेझॉन ओरिजिनल सीरिज दुसऱ्या सीझनमध्ये ज्या नाट्यमय वळणावर थांबली होती, तिथूनच या पुढील सीझनची सुरुवात होणार आहे. कशाचाही पश्चात्ताप न करत बसणाऱ्या, लोक काय म्हणतील याची तमा न बाळगणाऱ्या चार मुक्त स्त्रियांच्या आयुष्यावर ही सीरिज प्रकाश टाकणार आहे. मुंबईत राहणाऱ्या या चौघी आयुष्य मानमोकळेपणाने जगतात, प्रेम करतात, चुका करतात आणि त्यातून नवीन गोष्टी शिकतात. या त्यांच्या प्रवासात सगळ्यातून त्यांच्यातील मैत्रीचे नाते आधिकच घट्ट होत जाते.

तिसऱ्या सीझनमध्ये कीर्ती कुल्हारी, सयानी गुप्ता, मानवी गगरू आणि बानी या प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत, तर प्रतीक बब्बर, ,लिसा रे, नील भूपालन, राजीव सिद्धार्थ,अम्रिता पुरी, सिमोन सिंग व समीर कोचर त्यांच्या पूर्वीच्या भूमिकांमध्ये कायम आहेत. याबरोबरच नवीन सीझनमध्ये जिम सर्भ, रोहन मेहरा, शिल्पा शुक्ला व सुशांत सिंग ही कलाकार मंडळी नव्याने दिसणार आहेत. या सीरिजचे केवळ भारतातील नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांनी कौतुक केले आहे.

‘फोर मोर शॉट्स प्लीज!’मध्ये स्त्रियांमधील मैत्री जशी साजरी केली गेली आहे, तशी कोणत्याच शोमध्ये केली गेलेली नाही आणि या नवीन सीझनच्या माध्यमातून आमचा चाहतावर्ग आणखी वाढेल अशी आशा मला वाटत आहे,” असे निर्माते प्रीतिश नंदी यांनी स्पष्ट केले. तसेच या वेबसीरिजच्या क्रिएटर रंगीता प्रितिश नंदी म्हणाल्या “ पहिल्या सीझन मध्ये तुम्ही अंजना, दामिनी, उमंग आणि सिद्धीला भेटलात, दुसऱ्या सीझनमध्ये तुम्ही त्यांना चुकतान अडखळतान पाहिलं, आता तिसऱ्या सीझनमध्ये आपला योग्य सूर गवसलेल्या या मुली तुम्हाला बघायला मिळतील.”

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा