नवी दिल्ली : काँग्रेस नेते सचिन पायलट यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. राजस्तानच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसने पायलट यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या मते, पायलट राजस्तानचे नवे मुख्यमंत्री बनू शकतात. अशा स्थितीत विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पक्षाची अध्यक्षपदासाठी सर्वाधिक पसंती असल्याचे स्पष्ट होते. काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीची अधिसूचना जारी झाली आहे. दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होईल. याच पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी तातडीने राजधानी दिल्लीत दाखल होणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा