नवी दिल्ली : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान मोदी 27 सप्टेंबर रोजी जपानला जाणार आहेत. आबे यांना राज्य सन्मानाने अंतिम निरोप देण्यात येणार आहे. 8 जुलै रोजी त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यानंतर 17 जुलै रोजी आबे यांच्यावर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले. मात्र, आता त्यांना राज्य सन्मानाने अंतिम निरोप देण्यात येणार असून, त्यात जगभरातील अनेक बडे नेते सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर या राज्य सन्मानाला जपानमध्येही विरोध होत आहे. एका दिवसापूर्वी एका 70 वर्षीय व्यक्तीने विरोध करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जपानमध्ये सरकारी अंत्यसंस्काराची परंपरा नाही. यापूर्वी 1967 मध्ये केवळ माजी पंतप्रधान शिगेरू योशिदा यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तेथील लोक अशा कार्यक्रमाला पैशाची उधळपट्टी म्हणतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा