नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी यांनी ‘एक व्यक्ती-एक पद’ याचा पुनरुच्चार केला. उदयपूरमधील चिंतन शिबिरात घेतलेल्या ‘एक व्यक्ती-एक पद’ या निर्णयावर आपण बांधिल राहिले पाहिजे, असे राहुल यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी सध्या ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी आहेत. या यात्रेदरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजस्तानमधील उदयपूरमध्ये काँग्रेसचे चिंतन शिबिर पार पडले होते. या चिंतन शिबिरात पक्षाने ‘एक व्यक्ती-एक पद’चा निर्णय घेतला होता. यास सर्वांनी बांधिल राहावे, असा सल्ला त्यांनी अप्रत्यक्षरित्या राजस्तानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना दिला. गेहलोत हे अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. मात्र, मुख्यमंत्री पद सोडायला ते तयार नाहीत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा