नवी दिल्ली : केरळमधील पुल्लमपारा ग्रामपंचायत देशातील पूर्ण डिजिटल साक्षर पंचायत म्हणून घोषित करण्यात आली आहे. ही घोषणा राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केली. यादरम्यान ते म्हणाले की, तिरुअनंतपुरममधील पुल्लमपारा देशातील सर्व पंचायतींसाठी एक आदर्श बनले आहे.

मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले, सध्याच्या काळात केवळ साक्षर असणे पुरेसे नाही. चांगल्या दर्जाचे जीवन जगण्यासाठी डिजिटल साक्षरतादेखील महत्त्वाची झाली आहे. इंटरनेट हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित करणारे केरळ हे पहिले राज्य आहे. जेव्हा इंटरनेट प्रत्येकासाठी उपलब्ध होईल, तेव्हा सर्वांना ते वापरण्यासाठी सक्षम केले पाहिजे. सरकार केरळला नॉलेज सोसायटी बनवण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून नागरिक जगाच्या कोणत्याही भागातून माहिती मिळवू शकतील आणि त्याचा उत्पादकपणे वापर करू शकतील. राज्य सरकारने सुमारे 800 सरकारी सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा