मॉस्को : रशिया-युक्रेन युद्ध सात महिन्यांपासून सुरू आहे. दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 21 सप्टेंबर रोजी युक्रेनच्या चार प्रदेशात 3,00,000 राखीव सैन्य तैनात करण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर रशियात सर्वत्र निदर्शने सुरू झाली आहेत. पोलिसांनी हजारो लोकांना ताब्यात घेतले आहे.

येकातेरिनबर्गसह काही शहरांमध्ये पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला. पोलिसांनी लोकांना शांतता राखून घरी परतण्याचे आवाहन केले होते. आंदोलन अधिक तीव्र झाल्यानंतर पोलिसांनी लोकांवर लाठीमार केला.

निदर्शने आणि पोलिसांशी झालेल्या संघर्षाचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये पोलीस लोकांना मारहाण करताना दिसत आहेत. पोलीस आंदोलक महिलांना बेदम मारहाण करताना दिसले. एका व्हिडिओमध्ये काही पोलीस अधिकारी एका महिलेला ओढताना दिसत होते.

दुसर्‍या व्हिडिओमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. ’नो टू वॉर’च्या घोषणा दिल्या जात आहेत. मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गसह 38 शहरांमध्ये निदर्शने करणार्‍या सुमारे 1,371 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा