पुणे : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मॉल, दुकानांमध्ये वाईन विक्रीबाबत निर्णय घेण्यात आला असून या निर्णयासंदर्भात ग्रामीण तसेच शहरी स्तरावरील नागरिकांकडून सूचना, हरकती मागविण्यात आल्या होत्या. या सर्व सूचना हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार नागरिकांची सकारात्मकता आहे किंवा नाही हे तपासून संबंधित माहिती सचिवांपुढे सादर करून अहवाल तयार करण्यात येणार आहे. या अहवालावर स्वतः अभ्यास करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्री यांच्या समोर हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

देसाई यांनी बुधवारी पुणे जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देसाई म्हणाले, ‘मुख्यत्वे करून वाईन ही फळांपासून बनत असून त्यासाठी लागणारा कच्चा माल थेट शेतकर्‍यांकडून आल्यामुळे शेतकर्‍याला त्याचा लाभ मिळेल. आर्थिक उत्पन्न वाढेल. त्या हिताने तत्कालीन सरकारच्या काळात हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, नागरिकांचा अभिप्राय देखील महत्वाचा असून, सूचना, हरकती मागविण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा