पाच राज्यांतील निवडणूक

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशासह पाच राज्यांत वर्षाच्या सुरूवातीला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपने प्रचारावर तब्बल 340 कोटींचा खर्च केला. तर, याच निवडणुकांत काँग्रेसने 194 कोटींचा खर्च केला.

भाजपने निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या आणि सार्वजनिक केलेल्या अहवालानुसार, पक्षाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारावर 340 कोटींहून अधिक खर्च केला. यात सर्वाधिक 221 कोटींचा खर्च उत्तर प्रदेशात झाला. उत्तराखंडमध्ये 43.67 कोटी, पंजाबमध्ये 36 कोटी, मणिपूरमध्ये 23 कोटी, तर गोव्यात 19 कोटी पक्षाने प्रचारावर खर्च केले. तर काँग्रेसने पाच राज्यांतील निवडणूक प्रचारावर 194 कोटी खर्च केले.भाजप आणि काँग्रेस हे मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आहेत. पक्षांना त्यांच्या निवडणूक खर्चाचा अहवाल मुदतीत आयोगाकडे सादर करणे आवश्यक असते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा