परराष्ट्र मंत्रालयाची इंग्लंडकडे मागणी

लंडन : ब्रिटनमधील मुस्लिम कट्टरपंथीयांकडून मंदिरांबाहेर हिंसक निदर्शने आणि हल्ले केल्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने इंग्लंड सरकारशी चर्चा सुरू केली आहे. इंग्लंडमधील लिस्टर आणि बर्मिंगहॅम येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पुढील हल्ले रोखण्यासाठी भारतीय इंग्लंड सरकारच्या संपर्कात आहे, आम्ही दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दुसरीकडे, कॅनडातील खलिस्तान सार्वमतावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, हा एक हास्यास्पद कार्यक्रम आहे जो कॅनडातील अतिरेकी आणि कट्टरवादी घटकांनी आयोजित केला होता. हे प्रकरण कॅनडाच्या अधिकार्‍यांकडे मांडण्यात आले आहे. मैत्रीपूर्ण देशात राजकीय हेतूने प्रेरित कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे, हे आम्हाला अत्यंत आक्षेपार्ह वाटते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा