नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने एबीजी शीपयार्ड लिमिटेडची 2 हजार 747 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये डॉकयार्ड, शेतजमीन, व्यावसायिक मालमत्ता आणि बँकेत जमा केलेल्या पैशांचा समावेश आहे. ईडीने एबीजी शीपयार्ड आणि त्यांच्या समूह कंपन्या आणि त्यांच्या संबंधित कंपन्यांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. तपास संस्थेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जप्त केलेल्या मालमत्तेत शीपयार्ड, शेतजमीन आणि गुजरातमधील सुरत आणि दहेज येथील भूखंडांचा समावेश आहे. याशिवाय, गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध व्यावसायिक आणि निवासी परिसर आणि एबीजी शीपयार्ड लिमिटेडची बँक खाती, तिच्या समूह कंपन्या आणि इतर संलग्न कंपन्यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा